TOD Marathi

‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरुची अडारकर लग्नबंधनात अडकली आहे. सुरुचीने अभिनेता पियुष रानडे याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

सुरुची अडारकरने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. यात तिने तिच्या लग्नाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सुरुची ही नववधूच्या रुपात पाहायला मिळत आहे. तर अभिनेता पियुष रानडे हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र परिधान करताना दिसत आहे.

सुरुची अडारकरने २००६ मध्ये सिनसृष्टीत पदार्पण केले. पेहचान या मालिकेत ती झळकली. त्यानंतर तिने ‘अवघाची संसार’, ‘ओळख’, ‘एक तास भुताचा’, ‘आपलं बुवा असं आहे’ या मालिकांमध्ये काम केले. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सुरुची ही ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकली. सध्या ती ‘छोट्या बयोची मोठी स्वप्न’ या मालिकेत पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे पियुष रानडे हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. पियुष हा सध्या ‘काव्यांजली’ या मालिकेत विश्वजीतच्या भूमिकेत दिसत आहे. याआधी तो ‘अंजली झेप स्वप्नांची’ या मालिकेत झळकला. पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. याआधी तो अभिनेत्री शाल्मली टोळ्ये आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्नबंधनात अडकला होता. मात्र, लग्नाच्या काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

आतापर्यंत सुरुचीने कधीच पियुषसोबत एकही फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळे चाहत्यांसाठी हा गोड धक्का आहे. तसेच या फोटोवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज