TOD Marathi

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. (Hearing of Maharashtra Political Crisis in Supreme Court) मात्र, या सत्ता संघर्षाच्या सुनावणीवर आता काहीसं अनिश्चिततेचे सावट दिसत आहे. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, अनिल देसाई कोर्टाबाहेर निघाले आहेत. अर्थातच सकाळच्या सत्रामध्ये कामकाजात हे प्रकरण आलं नसण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामकाजात समावेशासाठी विनंती करण्याचा पर्याय आता शिवसेनेकडे शिल्लक आहे.

 

मागच्या सुनावणीच्या वेळी हे प्रकरण घटनापिठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ (Constitutional bench) काम करणार आहे. आज घटनापीठ काय निर्णय देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.  मात्र, आज या प्रकरणावर सुनावणी होणार का याबद्दल आता प्रश्न निर्माण झाला त्यामुळे पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडणार का? असाही प्रश्न निर्माण होतो.

 

शिवसेना आणी शिंदे गट हा सामना न्यायालयात गेला आणि यावर गेल्या काही दिवसात काही सुनावण्या देखील झाल्या. मागील सुनावणीनंतर हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. घटनापिठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आल्यानंतर या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.