TOD Marathi

सभागृहामध्ये Speaker व्यंकय्या नायडू रडले !; म्हणाले, विरोधकांच्या गदारोळामुळे रात्रभर झोपू शकलो नाही

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 11 ऑगस्ट 2021 – सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. जनतेच्या विविध प्रशांवर विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला धारेवर धरत राज्यसभेत गदारोळ घातला. यामुळे सभापती व्यंकय्या नायडू चांगलेच भावूक झाले. व्यंकय्या नायडू यांना विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

राज्यसभेमध्ये मंगळवारी झालेल्या गदारोळवर बोलताना भावूक झालेल्या व्यंकय्या नायडू यांनी म्हटले की, ‘काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले. तेव्हा या सभागृहाचे पावित्र्य नष्ट केलं. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही.

राज्यसभेमध्ये गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू कारवाई करणार आहेत. याच मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल यांसह इतर भाजप खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

राज्यसभेमध्ये मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले आणि आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली.

तसेच ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणा दिल्या. यावेळी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते.

जनतेचे प्रश्न मांडणे चूक आहे का ?
संसदेत खासदार जनतेचे प्रश्न मांडत असतात. मात्र, जर सत्ताधारी हे एकूण त्याला उत्तर देत नसतील तर संसदेत विरोधक तो प्रश्न, मुद्दा उचलून धरून गोंधळ घालतात.

हे व्हायचं नसेल तर, विरोधकांच्या प्रश्नांना सत्ताधारी सरकारने योग्यपणे आणि समर्पक उत्तर दिले पाहिजे. अन्यथा, जनतेचे प्रश्न मांडणे चूक आहे का ? असा प्रश्न खासदारांनाच नव्हे नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज