TOD Marathi

सोनालीने दाखविली सासरची झलक,अभिनेत्रीसाठी सासूबाईंनी केलं हे खास काम

संबंधित बातम्या

No Post Found

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेसुद्धा तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रतिसाद देत असतात. नुकतंच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये सोनाली निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत आहे. तर तिच्या सासूबाई तिचं औक्षण करताना दिसून येत आहेत. वास्तविक हा फोटो अभिनेत्रींच्या वाढदिवसाचा आहे. गेल्या आठवड्यात सोनालीने आपला वाढदिवस साजरा केला होता. लग्नानंतर सोनालीचा हा पहिला वाढदिवस होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

त्यामुळे अभिनेत्रीच्या सासरीसुद्धा तिचं जंगी सेलिब्रेशन झालं. अभिनेत्रीने हा सुंदर थ्रोबॅक फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सोनाली पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान सोनालीने आपले अनेक व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत. सोनालीने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पुन्हा सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवारासमोर लग्नगाठ बांधली आहे. कारण सोनाली गेल्यावेळी लॉकडाऊनमुळे दुबईत अडकली होती. त्यामुळे अभिनेत्रीने अगदी सध्या पद्धतीने कोर्ट मॅरिज केलं होतं.

.