तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये 4 मादी आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या(pm Narendra Modi 72 birthday) वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडलं.यावेळी मोदी आपल्या प्रोफेशनल कॅमेऱ्याने चित्त्यांची काही छायाचित्रे काढतानाही दिसले. (Cheetah in India )
पण या सर्व प्रकरणावर नरेंद्र मोदींवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.शिवसेना प्रवक्ते आणि आमदार सुनील प्रभू यांनी( Shivsena MLA Sunil Prabhu )पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, आता ते चित्त्यांबाबत राजकारण करत आहेत पण आम्ही पेंग्विन आणले तेव्हा त्यांच्या पोटात दुखत होते.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात मुंबईतील विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले की, शिवसेनेतून पळून गेलेले गुंड आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाजी पार्क दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्याचे आदेश त्यांनी दिले.याशिवाय 21 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेना गटप्रमुखांची बैठक घेणार आहेत. त्यासाठी तयारी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
यापूर्वी महाराष्ट्रात शिंदे सरकार आणि उद्धव गटात भांडण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला होता. काहीही झाले तरी शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेणार असल्याचे उद्धव म्हणाले होते. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे ते म्हणाले होते. या रॅलीसाठी राज्यभरातून शिवसैनिक पोहोचणार आहेत.