TOD Marathi

मुंबई: कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. आर्यन खान याच्यावरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींची मागणी करून ८ कोटी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना दिले जाणार असल्याचा धक्कादायक खुलासा पंच प्रभाकर साईलने केला आहे. यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्याच सोबत त्यांनी आपण प्रभाकरच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. प्रभाकर साईल याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो मात्र या साक्षीदाराला काही सुद्धा होऊ देणार नाही असा विश्वास राऊत यांनी दिला आहे.

या सर्व प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपूर्तेच मर्यादित नसून दिल्ली पर्यंत असल्याचंही ते म्हणाले. त्याच सोबत केपी गोसावी, परमबीर सिंग कुठे आहेत हे भाजपला माहीत असेल. गोसावीचा घातपात झाला की नाही हे ज्याने शंका उपस्थित केली. तेच सांगू शकतील. किंवा त्यांचे समर्थक पार्टीच सांगेल, असं ते म्हणाले. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. सॅम डिसोजाचा संदर्भ मनी लॉन्ड्रिंगमध्ये येतो. बड्या लोकांचे पैसे तो परदेशात पाठवतो. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.