मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis government) राज्यातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा असा निर्णय नुकताच घेतला आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करणार असल्याची घोषणा सरकारनं केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार रुपयांचं अनुदान देण्यात येतं. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, आगामी काळात महानगर पालिकांच्या निवडणुका येत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदार आपल्याकडे वळवण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न असण्याची शक्यता आहे.