TOD Marathi

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे सुरू केलेल्या दुर्गा उत्सव कार्यक्रमात दरवर्षी अनेक नेते भेटी देत असतात. आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही परंपरा कायम ठेवली. यावर्षी मात्र परिस्थिती वेगळी आहे, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे एका बाजूला तर एकनाथ शिंदे एका बाजूला अशी परिस्थिती आहे. यातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या आज टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला जाणार आहेत आणि आजच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षी शिंदे (Minakshi Shinde) यांनी आरतीची वेळ आधीच राखीव केलेली आहे. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे कार्यकर्ते अर्थातच मंडपात येतील. त्यामुळे यावेळेस परिस्थिती कशी असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला हजेरी लावली होती आणि माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका देखील केले होती. त्यानंतर आज रश्मी ठाकरे टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला येत आहेत.

शिंदे गटाच्या शितल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी रश्मी ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पूर्वी एक ट्विट केलं आहे. “अरेरे माननीय रश्मी वहिनी ठाण्याला जाणार म्हणून शिल्लक सेनेला मेसेज करून मुंबई मधून महिला गोळा करून गर्दी दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करावा लागत आहे.” अशी जळजळीत टीका शीतल म्हात्रे यांनी केल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिले आहे ठाण्यातील शिवसैनिक आपली ताकद दाखवून देतील असे देखील त्यांनी म्हटले आहे.