TOD Marathi

दुःखद! उद्या लग्न आणि आजच काळाचा घाला

छिंदवाडा:
नेहमीप्रमाणे ती काल नाश्ता करत होती. काल तिची हळदही होती. नाश्त्यात असलेला ढोकळा खाताना तिला ठसका लागला आणि त्यानंतर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी तीचं लग्न होतं. लग्नाच्या एक दिवस आधी घडलेल्या दुखःद प्रसंगामुळं लग्नघरावर शोककळा पसरली आहे.

मेघा काळे असं या तरुणीचे नाव असून ही तरुणी डॉक्टर होती. लग्नाच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, मेघाचा मृत्यू कसा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

हळदीच्या दिवशी ढोकळा खात असताना अचानक तिला ठसका लागला. त्यानंतर लगेचच तिने पाणी प्यायले. त्यानंतर मात्र तिला बोलता येत नव्हते. त्यामुळं तिची प्रकृती अधिकच बिघडली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हळदीच्याच दिवशी मृत्यू झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

पोलिसांनी शवविच्छेदनादरम्यान नाश्त्यातील नमुने गोळा केले आहेत. मेघाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याचा तपास करत आहेत. हे नुमने तपासणीसाठी लॅबमध्येही पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या रिपोर्टनंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.