TOD Marathi

नवी दिल्ली : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी कोर्टानं दोषी ठरवलं आहे. यासिनच्या शिक्षेवर 25 मे रोजी कोर्ट निकाल सुनावणार आहे. यासिन मलिक याने याआधीच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली होती.

यासिन मलिकने जम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नावाखाली जगभरातून बेकायदेशीर आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारला असल्याचे कोर्टाने याआधी म्हटले होते.

यासिन मलिकवर लावण्यात आलेल्या आरोपांनुसार यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. यासिन मलिकला 25 मे रोजी एनआयए विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार आहे.

दरम्यान मागील सुनावणीत यासिन मलिकने दिल्लीतील एनआयए कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कोर्टाने 19 मे पर्यंत सुनावणी टाळली होती