TOD Marathi

मुंबई : बंडखोरांमुळे शिवसेनेत फूट पडली असताना आता इडीची एंट्री झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजाविला आहे. त्यांना मंगळवारी ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणात राऊतांवर ही कारवाई केली जात आहे. (ED notice to Sanjay Raut)

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Shivsena) यांनी शिवसेनेविरुध्द बंड पुकारले आहे. ते चाळीसहून अधिक आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. भाजपबरोबर ते सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी ईडीची कारवाईचा धाक धाकवून आमदारांना फोडले असल्याचा आरोप भाजपवर केला होता. त्यांनी ईडीचा संबंध लावून अनेकदा भाजपवर टीका केली होती.

परंतु आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाच ईडीने समन्स बजाविले आहे. राऊत यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता इडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत.