राज्यसभा निवडणुकीपूर्वी (Rajya Sabha Election) संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. आता ‘स्वराज्य’चं बोधचिन्ह जनतेच्या कल्पनेतून साकारणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला ‘स्वराज्य’ला बोधचिन्ह सूचवण्याचं आवाहन केलं आहे. (Sambhaji Raje Chhatrapati Latest Marathi News)
“विस्थापित मावळ्यांना संघटित करून जनतेच्या मनातलं ‘स्वराज्य’ आणण्यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेचे अधिकृत बोधचिन्ह म्हणजेच लोगो जनतेच्याच संकल्पनेतून साकारावं, अशी आमची इच्छा आहे. ते बोधचिन्ह सुचवा”, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाद्वारे केलं आहे.
‘हे बोधचिन्ह सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणारे असे स्वराज्य संघटनेची ओळख असेल. ज्यांनी तयार केलेले बोधचिन्ह ‘स्वराज्य’चे अधिकृत बोधचिन्ह म्हणून स्वीकारले जाईल, त्यांस छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल’. असंही संभाजीराजेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
‘स्वराज्य’चं हे बोधचिन्ह कसं असावं याबद्दलही संभाजीराजे छत्रपती यांनी भूमिका मांडली आहे.