TOD Marathi

मुंबई : एके काळी अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगात होत्या. कसलीही तमा न बाळगता सैफ आणि अमृताने लग्न केल.

पण दोघांचं नातं काही दीर्घ काळ टिकू शकलं नाही. 1991 साली सैफ आणि अमृताने लग्न केल आणि अवघ्या 13 वर्षांनंतर म्हणजे 2004 साली त्यांनी नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर कायमचे वेगळे झालेले सैफ आणि अमृता अनेक वर्षांनंतर एकत्र आलेले पाहायला मिळालेत.

लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर या दोघांना एकत्र आणणारी अभिनेत्री सारा अली खान होती. एके काळी सैफ आणि सारातं नातं तुटलं होतं, दोघांच्याही मनात दु:ख होतं, त्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून पुरेसं अंतर ठेवलं होतं. पण आता अनेक वर्षांनी अमृता आणि सैफ अली खानची भेट झाली.

अमृता सोबत सैफही चांगल्या वडिलांचे कर्तव्य पार पाडत असतो. साराने जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तेव्हा तिला सोडवण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात सैफ अली खान गेला होता.

खास आपल्यासाठी इतक्या वर्षांनंतर आई-वडील एकत्र आले… तो दिवस सारासाठी कधीही विसरता येण्या सारखा नव्हता. असं एका मुलाखतीत साराने ही आठवण चाहत्यांसोबत शेअर केली.

साराने पुढे असंही सांगितले होते की, त्या दिवशी त्या तिघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर अमृता आणि सैफ साराला हॉस्टेलमध्ये सेटल करण्यासाठी गेले. जिथे अमृताने सारासाठी बेड बनवलं आणि वडील सैफने आभ्यासासाठी टेबल तयार केला.

या आठवणी साराच्या मनात आजही तितक्याच जिवंत आहेत. साराला सोडून आल्यानंतर दोघे कधीही भेटले नाहीत.