TOD Marathi

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने सकाळी छापा टाकला. त्यानंतर त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांच्यावर मुक्ताफळे उधळली आहेत.

“ही तर कर्माची फळं, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला” अशी बोचरी टीका सदावर्ते यांनी परबांवर केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. हे तर कर्माची फळं आहेत.” असं म्हणत सदावर्ते यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी लाडू वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान आज सकाळी ६.३० वाजल्यापासून अनिल परब यांच्या निवासस्थानासहित सात ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापा टाकला होता. त्यामध्ये त्यांचे निकटवर्तीय संजय कदम यांचाही सामावेश होता. त्यानंतर सदावर्ते यांनी लाडू वाटून जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे.

पहा व्हिडिओ –