TOD Marathi

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये वेळ घालवत आहे. आयपीएलचा थकवा दूर करण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्मा थेट मालदीवमध्ये गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांपैकी 10 सामने हारून आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.


रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी रितिका सोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

दोघेही समुद्राजवळ त्यांच्या खास क्षणांचा आनंद घेत आहेत.

ही पोस्ट शेअर करत रोहित शर्माने ‘पुढच्या काही दिवसांसाठी मला एवढीच गरज आहे.’ असं त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

मालदीवला रोहित शर्मासोबत पत्नी रितिका व्यतिरिक्त मुलगी समायरा देखील आहे.

टीम इंडियाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे.

या संपूर्ण मालिकेतून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.