टिओडी मराठी, पुणे, दि. 13 जून 2021 – सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांच्या मागील बाजूस मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक केले आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकतीच दिलीय.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली आहे. या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी १० टक्के घट करणेबाबत आदेश दिलेत.
रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात.
रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स मागील बाजूस बसविणे बंधनकारक आहे.
त्याबाबत केंद्र सरकारनेही आदेश दिलेत. या आदेशाबाबत काहीहि शंका असल्यास dytcenfl.tpt-mh@gov.in किंवा dycommr.enfl@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन देखील डॉ. ढाकणे यांनी केले आहे.