टिओडी मराठी, अकोला, 1 सप्टेंबर 2021 – अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. कनिष्ठ लिपिक पदाच्या सुमारे 100 जागांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 सप्टेंबर 2021 असणार आहे.
भरतीची पदे –
कनिष्ठ लिपिक – एकूण जागा 100
आवश्यक पात्रता आणि अनुभव –
कनिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेमध्ये पदवीधर उमेदवार असावा.
अशी होणार निवड –
- ऑनलाइन परीक्षा होणार. 75 % मार्क्स परीक्षेवर आणि मुलाखतीवर 25 % मार्क्स असणार.
- मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी बँकेच्या वेबसाइटवर प्रदर्शित करण्यात येईल.
- ऑनलाईन परीक्षेत एकूण 50% गुण आवश्यक आहेत.
- परीक्षा केवळ इंग्रजीत घेतली जाईल आणि परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 04 सप्टेंबर 2021
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/adccbjcaug21/ या लिंकवर क्लिक करा.