TOD Marathi

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली आहे. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारी ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील. विचार जुने असले तरी नव्या संसाधनाच्या मदतीने मार्ग काढले जाऊ शकतात, मी त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो ज्यांनी, त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात देशाच्या विकास मार्गात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचही मी आदरपूर्वक स्मरण करतो, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले. ‘आझादी का अमृत’ महोत्सवानिमित्ताने पुढच्या 25 वर्षात सर्वसमावेशक, सर्वहितकारक, आत्मनिर्भर भारतातासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. कोरोनाने अनेक लोकांना आपल्यापासून हिरावून घेतले. या काळात काम करणाऱ्या सर्व फ्रंटलाईन वर्कर आणि नागरिकांचे राष्ट्रपतींनी आभार मानले. पद्म पुरस्कारात देशभरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले, हे सरकार सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपतींनी सांगतले. कोरोनाच्या काळात अनेक देशात अन्नधान्याची कमी पाहायला मिळाले. परंतु 80 कोटी लाभार्थ्य़ांना फायदा मिळाला. तसेच डिजिटल इंडियातही सरकारने प्रभावी काम केलं. कोरोनातही पेय जल 6 करोड लोकांना फायदा झाला तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लोकांना फायदा झाला.
कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, हे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्यांच्या अभिभाषणात म्हणाले आहेत.
सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारताच्या संस्था काम करत आहेत. तेजस फायटर जेट हा त्याचाच भाग असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितले. सर्व 33 सैनिक शाळांनी आता मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशालाही सरकारने मान्यता दिली आहे. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जून 2022 मध्ये NDA मध्ये येईल, असं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले.