बाळासाहेब ठाकरे यांची मला आठवण येते, ते आजही माझ्या डोळ्यासमोर येतात. (I miss Balasaheb Thackeray) असं म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयीही प्रश्न उपस्थित केले. मी ५२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केले, राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार स्वप्नातही केला नव्हता.
आता आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, आयुष्याच्या संध्याकाळी असं सगळ होईल, असे वाटले नव्हते. गेल्या महिनाभराचा वेळ माझ्यासाठी फार वाईट होता. मला झोप लागत नाही, जेवण जात नाही. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आनंदी नाही. पण ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. ५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. (Ramdas Kadam resigned as Shivsena leader)
मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता. तुम्ही इकडे या, आपण बसून, बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, ही माझी अपेक्षा होती. पण तसं न होता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray should have asked me) यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरु नये, असा कडक इशाराही रामदास कदम यांनी दिला.