TOD Marathi

लातूर येथील विलासराव देशमुख वैदकीय महाविद्यालयात Adarsh Maitri Foundation च्या वतीने रक्षाबंधन सण साजरा

टिओडी मराठी, लातूर, दि. 22 ऑगस्ट 2021 – लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना काळातही रुग्ण सेवा देऊन आपले कर्तव्य बजावणाऱ्या सिस्टर सोबत आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सर्व संचालकांना सिस्टरकडून राखी बांधून घेतली आणि त्यांना स्नेह भेट दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता सुधीर देशमुख हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.संतोष डोपे, रूग्णालय अधीक्षक, तसेच अधिसेवीका अमृता पोहरे, आदर्श मैत्री फाउंडेशचे अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर, तुकाराम पाटील, रमेश बिराजदार, निलेश राजमाने, ॲड. दासराव शिरूरे, डि एस.पाटील, सुंदर पाटील कव्हेकर, कल्याण बदने, अशोक तोगरे, अरविंद औरादे, चंद्रशेखर गिरी, संतोष बालगीर, अमोल जाणते, तेजेश शेरखाने, राजेश मित्तल, तानाजी पवार आदींना उपस्थितीत सिस्टरच्या हस्ते राखी बांधण्यात आली तसेच त्यांना स्नेह भेट देऊन रक्षाबंधन साजरा केला.

आज रक्षाबंधन प्रत्येकजण हा सण आपआपल्या कुटुंबात आपल्या भावा समवेत साजरा करत असतात. या रुग्णालयातील सिस्टर आपला परिवार सोडून आपले कर्तव्य बजावत आहेत. तसे पाहता गेली दिड वर्षांपासून करोना काळात स्वतःच्या जीवाची, परिवाराची पर्वा न करता करोना रुग्णाची स्वतःच्या भावा प्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सेवा केली.

या सेवा बाजवणाऱ्या परिचारकांना ”सिस्टर” का संबोधले जाते? याचा प्रत्येय या काळात सर्वांना आला आहे. अशा या भगिनीकडून राखी बांधून घेऊन रक्षाबंधन हा सण सामाजिक बांधीलकी जोपासत साजरा करत आहे, असे मत फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी व्यक्त केले.

कर्तव्याची जाणीव ठेवून आंनदाने मन लावून काम केल्यास स्वतःलाही समाधान मिळते. समाज हि याची नोंद घेत असतो. त्याचेच उत्तम उदहारण आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने आज आमच्या सिस्टरच्या हस्ते राखी बांधून घेऊन त्यांना दिलेला सन्मान हा होय.

लातूर शहरातच् नव्हे तर म्हाराष्ट्र राज्यात प्रथमच आदर्श मैत्री फौंडेशनने असा उपक्रम राबवाला आहे, असे मत लातूर येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता सुधीर देशमुख यांनी व्यक्त केले आणि आदर्श मैत्रीच्या आदर्श कार्यासह सर्व संचालकांचे कौतुक केले

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराजजी मोटेगावकर यांनी केले. तुकाराम पाटील, डॉ.संतोष डोपे यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन अशोक तोगरे यांनी केले. आभार प्रदर्शन अमृता पोहरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रवीण सूर्यवंशी, कल्पना फरकांडे, मदन भगत, मयूर कदम आदींनी परिश्रम घेतले.