TOD Marathi

कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; आरोग्यमंत्री म्हणाले…

राज्यावर अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. आजच्या दिवसात राज्यात एकूण 254नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे देशात ओमायक्रोनच्या BA5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे. यामुळे राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावर माहिती दिलेली आहे.

राजेश टोपे म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येतोय. कोरोनाच्या रुग्णांची नोंद होतेय, विविध निमित्ताने लोक गर्दी करत आहेत, मेळावे आणि समारंभ होत आहेत, राजकीय कार्यक्रमही होत असून इथे लोक एकमेकांना भेटत आहेत. मात्र रुग्ण संख्येत अपेक्षित वाढ होत नाहीये. राज्यात सध्या 1950 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकर चांगलं झालं आहे.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार राज्यभरात प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करत तिथल्या आरोग्य विभागाचे संबंधित प्रश्न सोडविण्यावर भर देतोय.