TOD Marathi

मुंबई :
राज्यात पावसाळा सुरू झाल्यापासून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभर मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरल्याचं चित्र आहे. अनेक भागांमध्ये पूर परिस्थितीही ओढावली होती. अशातच आता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department gives alert) पुन्हा काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात ऐन गणेशोत्सवाला (Rain in Ganeshotsav) पुण्यासह महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. खरंतर, आठवड्याभरापासून पावसाने उसंत मारल्याचे पाहायला मिळतं. राज्यभर सध्या गणेशोत्सवाची धूम आहे, यामुळे हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, यंदाच्या गणेशोत्सवाला पुणे शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, इतकंच नाहीतर मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाची रिमझिम पाहायला मिळेल. तसेच कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सणासुदीच्या काळात पुणे, मुंबई उपनगरांसह कोल्हापूर, कोकण आणि साताऱ्यामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (Rainfall during Ganpati festival might be in Pune, Mumbai, Kolhapur, Kokan) यामुळे नागरिकांनी या दिवसांमध्ये हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.