TOD Marathi

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर 1 बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे, त्यामुळे काही काळासाठी रेल्वे वाहतूकही थांबवली आहे. सूरक्षेच्या दृष्टीने पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ पूर्णतः रिकामे केले आहेत. बीडीडीएसचं पथक रेल्वे स्थानकावर दाखल झालं आहे.

  • मोठा पोलिस बंदोबस्त पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या तैनात करण्यात आला असून एरवी वर्दळीचं ठिकान असलेलं पुणे स्टेशन जवळपास पूर्ण रिकामे करण्यात आले असून कोणीही जवळपास येण्याचा प्रयत्न करू नये, याची खबरदारी देखील पोलिस घेत आहेत.

जी बॉम्ब सदृश्य वस्तू पुणे स्टेशनवर सापडली ती वस्तू खुल्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुणे स्टेशन जवळपास पूर्ण रिकामं करण्यात आलेलं आहे.