TOD Marathi

नवी मुंबई : शिवसेनेचा आणि संजय राऊतांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस वापर करत असून शिवसेना रसातळाला जात आहे, अशा शब्दात भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

दरेकर यावेळेस बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार बनवत असताना सगळी शिवसेना राष्ट्रवादीची बटीक म्हणून संजय राऊत यांनी ठेवली आहे. त्यातून तुम्हाला काय मिळालं याचा अभ्यास त्यांनी करावा, दुसऱ्यांचं शहाणपण काढण्यापेक्षा आपल्याकडे लक्ष द्या

तसेच राज ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राज ठाकरे यांचा दौरा स्थगित झाला आहे, रद्द झाला नाही. राज ठाकरे यांना आयोध्या दौऱ्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असंही वक्तव्य त्यांनी येवेळेस सांगितलं आहे.