TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 ऑगस्ट 2021 – पेगासस फोन टॅपिंग मुद्यावरुन संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून गदारोळ माजला आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी याची चौकशीची मागणी केली आहे. आता, एनडीए सरकारमधील जनता दल यूनाइटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

नितीश कुमार यांनी याअगोदरही पेगासस प्ररणावर चिंता व्यक्त केलीय. मीडियाशी संवाद साधताना याबाबत प्रश्न विचारला असता नितीश कुमार म्हणाले की, याप्रकरणाची चौकशी व्हायला हवी.

अनेक दिवसांपासून पेगासस फोन टॅपिंगवर गोंधळ सुरूय. या मुद्यावर बोलायला हवे, चर्चा व्हावी. आजकाल काही सांगता येत नाही, कुणीही कोणत्याही पद्धतीने फोन हॅक करू शकतं. यावर गांभीर्याने विचार करुन ठोस पाउलं उचलावीत.

जाणून घ्या, पेगासस प्रकरण –
काही दिवसांपूर्वी काही आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी खुलासा केला होता की, इस्रायलमधील पेगाससस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतासह जगभरातील अनेक देशांमधील पत्रकार, नेते आणि मोठ्या व्यक्तींचे फोन टॅप केले आहेत.

भारतात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रशांत किशोर, पत्रकार एन. राम यांच्यासह अनेकांचे फोन टॅप केल्याचे ‘त्या’ रिपोर्टमधून सांगितले आहे. तो रिपोर्ट समोर आल्यापासून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सुरु ठेवले आहे.

या फोन टॅपिंगमुळे नागरिकांचे खाजगी आयुष्य धोक्यात येत आहे. तसेच स्वातंत्र्यावर गदा येत आहे. त्यामुळे याची चौकशी होणं आवश्यक आहे, असे विरोधक म्हणत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज