Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
प्रेरणादायी 'क्रांती'पर्वाची आठ दशके

TOD Marathi

प्रेरणादायी ‘क्रांती’पर्वाची आठ दशके

संबंधित बातम्या

No Post Found

पद्मश्री क्रांती शाह सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…

  • प्रशांत वाघाये
    बिरादर

सर्वप्रथम युवक बिरादरीचे संस्थापक, आमचे अनेकांचे मार्गदर्शक, पद्मश्री आदरणीय क्रांती शाह सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या हयातीत एखादी संस्था उभी करणे आणि बघता बघता ती संस्था वटवृक्षासारखी मोठी होते, एका ठिकाणावरून सुरू झालेल्या संस्थेचा देशभर व्याप होतो आणि 48 वर्ष ही संस्था अखंड प्रवास करते, तो प्रवास अव्याहतपणे सुरु राहतो हे सोपं नाहीये किंवा कोणाला करण्यासाठी सहज देखील नाही.

युवक बिरादरी (भारत) या संस्थेचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह (Padmashri Kranti Shah Birthday) यांचा आज 80 वा वाढदिवस. 1942 ला आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला, शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना चौकटीच्या बाहेर जाऊन वेगळा विचार करणारा युवक म्हणजे क्रांती शाह. आपल्या काही मित्रांच्या समवेत युवक बिरादरी (Yuvak Biradari Bharat) या संस्थेची स्थापना त्यांनी केली. 1974 ला स्थापन केलेल्या या संस्थेला बघता बघता 48 वर्षे झाली. दरम्यानच्या कालावधीत अनेक पुरस्कार संस्थेला प्राप्त झाली. युवा चळवळीला उत्कृष्ट मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय युवा पुरस्कार 1992-93 साली युवक बिरादरीला देण्यात आला, त्यानंतर 2010 साली पद्मश्री हा किताब तत्कालिन राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील (Then time President of India Hon. Pratibhatai Patil) यांच्या हस्ते क्रांती शाह यांना देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. आज वयाची 80 पूर्ण करत असताना त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ही सर्व बिरादरांच्या वतीने सदिच्छा.

या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात, युवकांना केंद्रस्थानी ठेवून ते आखण्यात आले आहेत. युवक बिरादरीचे अनेक बिरादर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम करत आहेत, यशस्वी झाली आहेत आणि आपल्या सोबत त्यांनी अनेकांना एक चांगला मार्ग दिलेला आहे.

हे सगळं होण्यासाठी जे स्वप्न बघितलं होतं ते क्रांती शहा यांनी बघितलं होतं. लहानपासुन मनात असलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी 48 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आणि आज वटवृक्ष झालेल्या संस्थेचा कुणालाही अभिमान वाटेल. पुढील दोनच वर्षानंतर ही संस्था सुवर्ण महोत्सवी वर्षात असेल.

पद्मश्री क्रांती शहा यांनी युवक बिरादरी भारत या संस्थेची स्थापना केल्यापासून आज पर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेले, सोबत असलेले सर्व बिरादार यांचं त्यांच्या हृदयात महत्त्वपूर्ण स्थान आहे. आयुष्यात मला जे काही मिळालं ते बिरादरी मुळे मिळालं असं ते अनेकदा सांगतात. अनेक दिग्गजांनी बिरादरीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, आजही घेतात.

अभिरुप युवा संसद, एक सूर एक ताल, युवाभूषण, पुण्यतीर्थ भारत (Mock Parliament, Ek Sur Ek Taal, Yuva Bhushan, Punyatirth Bharat) यांसारख्या उपक्रमांमधून आमच्यासारख्या अनेक युवकांना युवक बिरादरीने विविध क्षेत्रांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर एक प्लॅटफॉर्म दिला ज्यामुळे युवका स्वतःला त्या ठिकाणी सादर करु शकले. मी स्वतः अभिरुप युवा संसद या कार्यक्रमातून बिरादरीचा भाग झालो महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘अभिरुप युवा संसद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्याची संधी मला प्राप्त झाली आणि तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.

युवक बिरादरी ही चळवळ अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी भारतभरात विविध ठिकाणी युवक बिरादरीचे बिरादर कार्यरत आहेत त्यामध्ये मीही एक छोटासा भाग आहे याचा आनंद आहे.

पूर्व विदर्भाच्या टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला आदरणीय क्रांती शाह सर यांनी एक जबाबदारी दिली. ज्यामुळे मी महाराष्ट्र पिंजून काढला, त्यांच्यामुळे महाराष्ट्रात थोडीफार का होईना मात्र ओळख निर्माण झाली. अनेक ठिकाणी जिथे मी जाऊ शकेल की नाही असं मला वाटत होतं तिथे पोहोचवलं. एखाद्या व्यक्तीकडे गुण असले तरी कधी तरी कुणी विश्वास दाखवावा लागतो तो सरांनी माझ्यावर दाखवला. माझ्यासारख्या अनेक तरुणांवर दाखवला. अनेक तरुण युवक बिरादरीच्या माध्यमातून त्यांचं कौशल्य सिद्ध करु शकले. कधीतरी जे विद्यार्थी होते, बिरादरीच्या विविध उपक्रमातील सहभागी होते, ते पुढे बिरादरीत महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करु लागले. आजही करत आहेत. कला, सांस्कृतिक, क्षेत्रात अनेकांना मोठा प्लेटफार्म बिरादरीने दिला.

ज्यांनी हे सगळं गेल्या 80 वर्षात घडवून आणलं ते आमचे सन्माननीय मार्गदर्शक पद्मश्री क्रांती शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरंतर खूप काही व्यक्त करायचं आहे मात्र शब्दांना मर्यादा आहेत. युवा चळवळीला, युवकांना क्रांती शाह यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचं मार्गदर्शन सातत्याने लाभत राहो एवढी सदिच्छा आजच्या या प्रसंगी व्यक्त करतो, पुनश्च एकदा आदरणीय क्रांती शाह सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज