सिंधुदुर्ग | कोकणातील रिफायनरीचं ( Kokan Refinery ) कामकाज चालू असताना राजपूर तालुक्यातील शिवणे खुर्द ( Shivane Khurd) गावात झालेल्या आंदोलनाची दखल आता प्रशासनानं घेतली आहे. एमआयडीसीचे (MIDC ) रत्नागिरी, सिंधुदुर्ग (Ratnagiri, Sindhudurg ) जिल्ह्याचे RM आंदोलकांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास एमआयडीसीचे अधिकारी भेट घेणार असून प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत माघार न घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.
शासन, स्थानिक प्रशासन विश्वासात न घेता रिफायनरी संबंधित काम करत असल्यानं नागरिकांचा रोष वाढला आणि त्यांनी ठिय्या मांडला. रिफायनरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राजापूर तालुक्यामधील (Rajapur Taluka) शिवणे खुर्द गावच्या सड्यावर बुधवारी (8 जून) दुपारी तीन वाजल्यापासून सर्वेक्षणाच्या ( Survey for Refinery) कामाला सुरुवात झाली होती. गावात माती परीक्षण, ड्रोनमार्फत ( By drone) सर्व्हे केला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर शिवणे खुर्दच्या सड्यावर येत नागरिकांनी ठिय्या मांडला. जवळपास 600 नागरिक सर्वेक्षण विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये महिला पुरुष, तरुण वृद्ध यांचा समावेश सुरु होता. ( Notice of agitation of locals opposing Konkan refinery survey )
दरम्यान काल दुपारी तीन वाजता सुरु झालेलं ठिय्या आंदोलन पहाटेपर्यंत सुरु होतं. नागरिकांनी काळ्या कुट्ट अंधारात उघड्या माळरानावर आंदोलनाचा पवित्रा घेतला. पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता रिफायनरी विरोधी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.