TOD Marathi

मुंबईः शिवसंग्रामचे नेते, माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास करताना काही संशयास्पद गोष्टी आहेत का, याची चौकशी पोलिसांकडून (Raigad Police) केली जात आहे. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून मेटे यांच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले होते. रायगड पोलिसांनी ड्रायव्हर एकनाथ कदम (Eknath Kadam) याची चौकशी केली. मात्र यामध्ये त्याने समाधानकारक उत्तरे दिले नसल्याचे आढळून आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विनायक मेटेंचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड या दोघांचेही फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. (Phone Record) ज्या आयशरने मेटेंच्या गाडीला धडक दिली, त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही ड्रायव्हरची चौकशी केली जात आहे.

14 ऑगस्ट रोजी विनायक मेटे हे बीडवरुन मुंबईकडे जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

पोलिस टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. प्रवासादरम्यान, ड्रायव्हर, बॉडीगार्ड आणि विनायक मेटे यांना कुणाचे फोन आले होते, याचाही तपास पोलीस करणार आहेत. मेटे यांच्या कॉल्सचा डाटा पोलीस तपासणार आहेत. तसेच घटनेच्या वेळी ये-जा करणाऱ्या गाड्यांचाही तपास केला जाईल, अशी माहिती आहे.