TOD Marathi

राज्यात पुढच्या काळात ९२ नगर परिषदा आणि ४ नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. (Local body election in Maharashtra announced by EC Maharashtra) निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच या संदर्भातील घोषणा केली आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. (OBC Reservation in Election) १८ ऑगस्टला मतदान होणार असून १९ ऑगस्टला निकाल लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, मात्र आता ओबीसी आरक्षणाबाबत विरोधी पक्षाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निवडणूक आयोगाची निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात या संदर्भात चर्चा केली जाईल असेही म्हटलं आहे, त्यामुळे वेळेवर निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. (NCP took big decision) येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. (NCP State President Jayant Patil informs about decision)

“ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे”, (NCP will give 27% reservation to OBC candidates) अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

 

धनंजय मुंडे यांनीही केले ट्विट
“राज्यातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असल्या, तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना २७% जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका आहे व राहील”, असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. (Dhananjay Munde Tweeted)