सध्या नवाब मलिक यांची चर्चा होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी जेलमधून जामिनावर सुटलेले नवाब मलिक कोणाला पाठिंबा देणार याची अनेकांनी प्रतिक्षा होती.याचं उत्तर कालच्या सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात मिळालं. नवाब मलिकांनी कालच्या अधिवेशनाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी थेट अजित पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली आणि अधिवेशनाच्या वेळी ते अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन बसले. आणि मलिक पवार गटात असल्याचं स्पष्ट झालं….अधिवेशनात याची चर्चा झाली फडणवीसांनी अजित पवारांनी दिलेल पत्र व्हायरल झालं.
यानंतर अजित पवारांनी आज सकाळी यावर बोलताना त्यांनी अजून त्याची अधिकृत भूमिका मांडली नाही असं स्पष्ट केलं. मलिक जामिनावर असल्यामुळे ते माध्यमांशी संवाद साधू शकत नाही.त्यामुळे त्याची भूमिका काय हे ते सोशल मिडीयाद्वारे मांडतील असं सांगितलं जात आहे.मात्र आता पुन्हा एकदा आता मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला होता. सातत्याने त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करत न्यायालयात दाद मागितली होती.नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा कोर्टात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांना केवळ आणि केवळ नाजूक प्रकृती असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यांच्याकडून जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप तपास यंत्रणांकडून होत आहे. यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे