TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 9 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र राज्यात होणा-या आगामी 14 महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार, असे ठामपणे सांगता येणार नाही. आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत. अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

यावेळी नवाब मलिक म्हणाले, राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कोणत्याही पक्षाची भूमिका नाही.

यामुळे स्थानिक लोक जे निर्णय घेतील त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार या निवडणुका होणार आहेत. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही.

काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही. काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस हे समोरासमोर लढतील. तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना अशी लढत होणार आहे.

ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल तेव्हा ती परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार आहे, असे मलिक म्हणाले आहेत.