TOD Marathi

पुणे :  देहूचे  शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi )  यांनी देहुनगरीत ( Dehu Nagari ) पार पडलेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे.

मोदी म्हणाले की, संत तुकारामजांचा दयाळूपणा, करुणा आणि सेवेची जाणीव त्यांच्या ‘अभंगां’च्या रूपात अजूनही आहे. या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जे नष्ट होत नाही, जे शाश्वत राहते आणि काळाबरोबर संबंधित असते, ते अखंड असते. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली. पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यांत होईल. संत तुकाराम पालखी महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी ३५० किलोमीटर असेल. त्यासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च होईल.

आपण आपल्या प्राचीन परंपरा जिवंत ठेवल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विकास आणि वारसा एकत्रपणे पुढे केले पाहिजे. पंढरपुरातील पालखी मार्गाप्रमाणे चारधाम मार्ग, ( Chardham Road)सोमनाथ मंदिर ( Somanath Mandir ) आणि अयोध्येतील राममंदिराचे (Ram Mandir In Ayodhya ) कामही वेगाने सुरु असल्याचंही मोदींनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे.