TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 16 ऑगस्ट 2021 – येथील वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदासाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 सप्टेंबर 2021 असणार आहे.

हि आहेत भरतीची पदे –

  • (Director and Assistant Professor) संचालक आणि सहाय्यक प्राध्यापक
  • (Assistant Professor) सहाय्यक प्राध्यापक
  • (Project Officer) प्रकल्प अधिकारी
  • (Clerk Typist) लिपिक टंकलेखक

शैक्षणिक पात्रता –

  • संचालक आणि सहाय्यक प्राध्यापक (Director and Assistant Professor) – पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी.
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी.
  • प्रकल्प अधिकारी (Project Officer) – पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी.
  • लिपिक टंकलेखक (Clerk Typist) – पदवी आणि पदव्युत्तर पदवी असावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :
वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 02 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.