TOD Marathi

भंडारा जिल्ह्यात एक विचित्र अपघात (bhandara road accident) घडला आहे.दोन ट्रक आणि राज्य परिवहन विभागाच्या एका बसमध्ये विचित्र अपघात झाला.भंडारा जिल्हातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर बेला परिसराजवळ संबंधित घटना घडली.या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे फोटो आता सोशल मीडियावर सद्या प्रचंड व्हायरल होत आहे. या अपघाताने कोणत्याही जीवितहानी झाली नाही पण महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. अखेर पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली.

भंडाराहून नागपूरच्या (nagpur bhandara road accident) दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा अचानक टायर निघाल्याने तो अनियंत्रित झाला. यावेळी त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक आणि ट्रेलरच्या मागे असणारी बस सुद्धा अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणारा ट्रक आणि बसमध्ये अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे अपघातग्रस्त बसपासून बचाव करणारा ट्रक अनियंत्रित होऊन पलटला. तर प्रवाशांना वाचवण्यासाठी बस चालकाने सरळ बस रस्त्याच्या कडेला नाल्यात उतरवली. यात सर्वांचे नशीब इतके बलवत्तर होते की एकाही वाहनातील व्यक्तिची जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातानंतर वाहतूक मात्र खोळंबली होती.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यात आज आणखी एक भीषण अपघात झाला आहे. अनियंत्रित ट्रक पलटल्याने ट्रक खाली दबुन ड्रायव्हरचा मृत्यु झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर धारगाव येथे घडली. रात्री 2 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. तर या घटनेत क्लीनर हा थोडक्यात बचावला आहे. मृत डायव्हरचे नाव सर्वेश सोनी असे आहे.तो छत्तीसगढ़ येथील रहिवाशी होता.खरंतर एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करत असताना या तीनही वाहनांचा विचित्र अपघात झाला.कारधा पोलिसांनी या अपघाताची नोंद केली आहे.