TOD Marathi

लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) लोणावळा (Lonavala) येथे घाटात अपघात झाला आहे. आणि त्यामुळे जवळपास 2 किमी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवामुळे मुंबईहून अनेक जण गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यातच आज शनिवार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर रहदारी नेहमीपेक्षा जास्त आहे.

लोणावळ्यातील अमृतांजन पुलाजवळ झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. दीड ते दोन किलोमीटरपर्यंत मोठी वाहतूककोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये वाहनं अडकून पडली आहेत. गणेशोत्सव जवळ असल्यानं मुंबईबाहेर जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.