गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘पाठिंबा’ दर्शविला, त्या ‘वाय’ (Y) या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत.
View this post on Instagram
कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.