मुंबई: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी यांचा विवाह हा नुकताच अभिनेत्री शिवानी रांगोळी हिच्याशी पार पडला. सिनेसृष्टीतील कलाकारांसह विविध मान्यवरांनी देखिल दोघांना शुभेच्छा दिल्या.
विराजस आणि शिवानी या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहित दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच आम्हाला तुम्ही खूप प्रेम दिलत, नव्या जोडीबरोबरही तुमच्या शुभेच्छा कायम असू द्या असे देखील मृणाल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. या पोस्ट सोबत मृणाल कुलकर्णी यांनी दोन्ही जोडयांचे अर्थात मृणाल यांनी त्यांचे पती रुचिर कुलकर्णी यांच्यासमवेत आणि नवी जोडी विराजस व शिवानी असे दोन फोटो देखील जोडले आहेत.
काय आहे मृणाल कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट:
आयुष्यातले एक नवे पर्व ..हा प्रवास सुंदर होता .. आणि यापुढेही आनंददायी राहील असा विश्वास आहे .. तुम्हा सर्वांच्या साक्षीने विराजस आणि शिवानी सहजीवनाचा प्रारंभ करत आहेत .. आम्हाला खूप प्रेम दिलंत .. नव्या जोडीबरोबरही तुमच्या शुभेच्छा कायम असूद्या