TOD Marathi

झी मराठी (Zee Marathi) वरील ‘लागिरं झालं जी’ (lagir zal ji) आणि आता देव माणूस (devmanus) या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारुन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे किरण गायकवाड (kiran gaikwad).

पण ‘देवमाणूस’ (devmanus) या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. उत्तम अभिनयशैली आणि हटके स्टाइल यामुळे किरण सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. यात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो विविध पोस्टही आपल्या सोशल मीडिया साइट्स वरती शेअर करत असतो. अनेकदा किरणच्या पोस्ट सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल होतात. यामध्येच सध्या त्याची एक नवी पोस्ट भलतीच चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही “काळासाठी आपण इन्स्टाग्राम बंद ठेवणार” अशी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. किरणने खरंच इन्स्टाग्राम सोडण्याचा निर्णय घेतला का?असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.