TOD Marathi

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी केतकी चितळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे.

दरम्यान केतकी विरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकीचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.