TOD Marathi

मुंबई :

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर ते सातत्यानं भाष्यही करताना दिसत आहेत. दरम्यान, नुकतीच त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार निशाणा साधला आहे. “इतिहास तुम्हाला दगाबाज हीच उपमा देणार”, असं त्यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टमधून म्हटलं आहे. मात्र त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या भाषणाची पार्श्वभूमी आहे. (History will compare you with Dagabaz Kedar Dighe FB post viral)

केदार दिघे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ठरवून घडलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत म्हणाल्याची ही बातमी आहे.

दरम्यान, हिंदुत्व, अन्याय हे सर्व अचानक घडलं… हे फक्त सर्व सर्वसामान्य माणसाला सांगण्यासाठी आहे. पण हे सत्य आता ओठावर येऊ लागलं आहे. शिवसेना फोडायची हे आधीच ठरलं होतं, असं या बातमीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. हीच प्रतिक्रिया आणि बातमी केदार दिघे यांनी शेअर करत “जेव्हा कधी आजचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहास तुम्हाला दगाबाज हीच उपमा देईल हे विसरू नका” असं त्यांनी म्हटलं आहे.

 

केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. तसेच आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे गुरु. ठाण्यात आनंद दिघेंचं बोट धरुन आपला शिवसेनेतील प्रवास सुरु झाल्याचं एकनाथ शिंदे सांगतात. दरम्यान, शिवसेनेतून बंड केल्यानंतर आणि भाजपसोबत नव्यानं सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह गुरु आनंद दिघे यांचही नाव शिंदे कायमच घेत असतात.