TOD Marathi

सोनी मराठी (Sony Marathi) वरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) या कार्यक्रमाचे नवे पर्व ६ जून रोजी सुरू झाले आहे. विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा (Tanuja) आणि लाडकी अभिनेत्री काजोल (Kajol) या मायलेकींची गोड जोडी या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात खेळण्यासाठी उपस्थित राहणार आहे. या माय लेकीची जोडी ही ‘एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर’ (ADAPT) या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’ हा खेळ खेळणार असून ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध बघायला मिळणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ह्या दोघी ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati) च्या शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या पहिल्याच विशेष भागात सहभागी होणार आहेत. या भागात काजोलच्या नावाची अनोखी गंमत, काजोलच्या लहानपणीचे गमतीदार किस्से अशा भरपूर किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी गप्पा मारताना होणार आहे. काजोलला ‘बाजिगर’ या चित्रपटाच्या सेटवर शाहरूख (Shah Rukh Khan) खान का बरं ओरडला, काजोलचा पहिला सिनेमा बघताना तिची आई म्हणजेच तनुजाने तिचा हात घट्ट का धरून ठेवला होता, तनुजा यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे मजेशीर अनुभव; अशा अनेक गोष्टींनी हा विशेष भाग रंगलेला आहे. त्यामुळे विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.