टिओडी मराठी, वर्धा, दि. 9 ऑगस्ट 2021 – वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयमध्ये विविध पदे रिक्त असून या पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. अधीक्षक, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई या पदासाठी ही भरती होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 16 ऑगस्ट 2021 असणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांचे दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं. तसेच काही पदांसाठी पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
वर्धा जिल्हा सत्र न्यायालय, वर्धा, राज्य – महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 16 ऑगस्ट 2021
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.