TOD Marathi

मुंबई येथील National Institute for Research in Reproductive Health मध्ये ‘या’ पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2021 – मुंबई येथील राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थामध्ये विविध पदे रिक्त असून हि सर्व पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केलेली आहे.यात तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर आणि संशोधन सहाय्यक या पदाचा समावेश आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 आणि 25 ऑगस्ट 2021 अशी आहे.

भरतीचे पदे –

  1. (Technical Assistant) तांत्रिक सहाय्यक
  2. (Lab Attendant) प्रयोगशाळा परिचर

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • (Technical Assistant) तांत्रिक सहाय्यक – सायन्समध्ये ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.
  • (Lab Attendant) प्रयोगशाळा परिचर – दहावी उत्तीर्ण असावा.

एवढा मिळणार पगार :

  • तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) – 31,000/- रुपये प्रतिमहिना
  • प्रयोगशाळा परिचर  (Lab Attendant) – 15,000/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.nirrh.res.in/opportunities/ या लिंकवर क्लिक करा.