टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 ऑगस्ट 2021 – झारखंडच्या एका न्यायाधीशाच्या अंगावर रिक्षा घालून त्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्याच्या तपास कामाचा दर आठवड्याला आढावा घेणार आहे, अशी सूचना झारखंड हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे.
सीबीआयनेही दर आठवड्याला या तपास कामाचा अहवाल मुख्य न्यायाधीशांकडे सादर केला पाहिजे, अशी सूचनाही सुप्रीम कोर्टाने केलीय. धनबादचे सेशन जज उत्तम आनंद यांची मागील महिन्यामध्ये ते मॉर्निंग वॉकला गेले होते.
यावेळी त्यांच्या अंगावर रिक्षा घालून हत्या केली होती. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्वत: दखल घेतली आहे. आणि या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे.
न्यायाधीश हत्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. सोशल मीडियावर याचा निषेध व्यक्त केला आहे.
जर न्यायाधीश यांची अशी हत्या होत असेल तर सामान्य नागरिक सुरक्षित आहे का? असा सवाल देखील यानिमित्त उपस्थित होत आहे.