TOD Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (NCP State President and Minister Jayant Patil) हे राजकीय पटलावर आपल्या संघटन कौशल्यासाठी, अभ्यासासाठी, मिश्कील टिपणीसाठी ओळखले जातात. मात्र सध्या जयंत पाटील या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त एका खास पोस्टमुळे चर्चेत आहेत. जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये जयंत पाटील आणि शैलजा पाटील (Shailaja Patil) यांची तरुणपणीची छायाचित्रं आहेत, हे फोटोज़ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छा आणि प्रतिक्रियांचा तर पाऊस पडत आहे.

जयंत पाटील यांनी या पोस्टमध्ये आपल्या पत्नीचे आभार व्यक्त केले आहेत.

“माझ्या यश-अपयशात, सुख-दुःखात नेहमीच साथ दिलीत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खांद्याला खांदा लावून माझ्या संगिनी बनलात. शैलजा, तुम्ही खऱ्या अर्थाने माझी सहचारिणी ठरलात. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.”

जयंत पाटील नुकतेच कुटुंबीयांसह केदारनाथाच्या (Kedarnath) दर्शनाला गेले होते. त्यांनी सोशल मीडियावर फोटो टाकून याबाबत माहिती दिली होती. बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे त्यांनी दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले, अशी भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

एरवी आपल्या राजकीय प्रतिक्रियांसाठी चर्चेत राहणारे जयंत पाटील (Jayant Patil) यावेळी मात्र एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे.