TOD Marathi

इंग्लंड :
भारत आणि इंग्लड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा T20 सामना आज नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर खेळवला जाईल. (Third match between India and England) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आज मैदानात उतरणार आहे. (Rohit Sharma captain of team India) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना प्रसारित होईल.

तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत भारताने आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास भारत इंग्लंडला व्हाईट वॉश देईल. दुसरीकडे शेवटचा सामना जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंड देखील प्रयत्न करेल.

असा असेल भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक