टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 13 जुलै 2021 – गेल्या दीड वर्षापासून देशात असलेला करोना संकट त्यात लॉकडाऊन व वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिक हातबल झालेत. मात्र, या महागाईमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये घसघशीत वाढ केली आहे.
नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 11 टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 17 टक्के महागाई भत्ता मिळतो, यात वाढ करून तो आता 28 टक्के केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला. महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे.
करोनामुळे गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढ केलेली नाही. आता मात्र कर्मचाऱ्यांना घसघशीत वाढ मिळाली आहे. मात्र, वाढीमुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भार पडणार आहे.