TOD Marathi

मुंबई:
मुंबई विद्यापाठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त नामवंत छायाचित्रकारांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. विविध मान्यवरांसोबत बाळासाहेबांनी घालवलेले क्षण कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आले आहेत.

या चित्र प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा एक इमोशनल फोटो आहे. “शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे… तो पाहून मी तर निःशब्दच झालो.” अशा भावना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेतील त्या फोटोजवळ उभं राहत रोहित पवार यांनी फोटो काढलाय. तो फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

रोहित पवार यांच्यासह या चित्रप्रदर्शनात इतर नेत्यांनीही भेट देत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या आहेत.