TOD Marathi

पुणे :  बारावीचा कोल्हापूर विभागाचा (Kolhapur Region ) 95.7 टक्के निकाल लागला आहे. बोर्डाकडून (HSC Board ) निकालाची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आलीय. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षीत असलेला बारावी बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. निकालामध्ये कोकण विभागानं (kokan Region ) बाजी मारली असून निकाल 97.21 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा (Kolhapur region ) 95.7 टक्के लागला आहे. राज्यात यावर्षीही मुलींनी निकाल बाजी मारली आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ( HSC Board Result Out )

राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला असून विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येईल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. (Total student for HSC Result )