TOD Marathi

‘टाइमपास ३’ मध्ये हृता दुर्गुळे दिसणार एकदम दबंग अंदाजात.

संबंधित बातम्या

No Post Found

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’  फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर या जोडीनं ‘मला वेड लागले प्रेमाचे’ असं सर्वांनाच म्हणायला भाग पाडलं होतं.  नवीन चेहेरे असूनही सिनेमानं मात्र बॉक्सऑफिसवर लांब पर्यंत मजल मारली होती. या सिनेमातील संवाद,गाणी यांनी त्यावेळी लोकांना अगदी मंत्रमुग्ध केलं होतं. अगदी गल्लीच्या नाक्यापासून ते कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत सगळीकडेच टाइमपास फिव्हर पहायला मिळाला होता. प्रिया बापट आणि प्रियदर्शन जाधवच्या ‘टाइमपास २’ ने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.

आता ‘टाइमपास ३’ भेटीस येतोय अशी बातमी पसरली आहे. आणि त्यात हृता दुर्गुळे  प्राजक्ता साकारताना दिसणार आहे. ‘मन उडू उडू..’ मालिकेत दिसणारी साधीभोळी दीपू म्हणजे हृता ‘टाइमपास ३’ मध्ये दबंग अंदाजात दिसणार असल्याची बातमी कानावर पडते आहे. याविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळाली नसली तरी बातमी ऐकून हृताचे चाहते मात्र सुखावले आहेत.

दुसऱ्या भागाचा शेवट दगडू -प्राजक्ताच्या मिलनानं झाला पण आता तिसऱ्या भागात प्राजक्ता बदलली म्हणजे ‘टाइमपास ३’ हा एका टोटल वेगळ्या कथानकाचा भाग असेल असे संकेत मांडले जात आहेत. त्यात नेहमीच आपल्या भूमिकांमधून सॉफ्ट,भावूक भूमिका करताना दिसलेली हृता एकदम दबंग अंदाजात दिसणार असं बोललं जात असल्यामुळे तिच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढली आहे.